लेमनग्रास (गवती चहा) ही त्वचेसाठी अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे.त्वचा स्वच्छ, उजळ आणि निरोगी ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
खास करून तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम उपाय ठरतो.लेमनग्रासमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करतात.लेमनग्रासच्या अर्काचा किंवा टोनरचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स, अॅक्ने आणि ब्लॅकहेड्स कमी होतात.लेमनग्रासमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि त्वचा उजळ, तजेलदार आणि टवटवीत दिसते.
लेमनग्रासचा वास व त्याचे थंडसर गुणधर्म त्वचेला ताजेतवाने करतात आणि तणावही कमी करतात.लेमनग्रासचा उपयोग कसा करावा? लेमनग्रास चहा बनवून गार करून टोनर म्हणून वापरा.लेमनग्रासचं आवश्यकतेनुसार तेल पाण्यात मिसळून फेशियल स्टीम घ्या.नियमित वापर केल्यास नैसर्गिकरित्या त्वचेची चमक वाढवण्यास नक्कीच मदत होते!