जेव्हा घरगुती हिंसाचार म्हटला की महिलांवरच सर्वाधिक अत्याचार होत असतात. बहुतांशी वेळा ते खरेच असते. परंतू याबाबत संयुक्त राष्ट्र संघटनेचा अहवाल धक्कादायक आहे. अनेक देशात घरगुती हिंसाचारात महिला देखील आघाडीवर असून पुरुषांच्या खांद्यास खांदा मिळवत पतीची चंपी करीत आहेत.आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतासारखा पुरुषप्रधान संस्कृती असलेला भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकांवर आहे. म्हणजे महिलांनी आपल्या पतीला मारहाण करणे जगात सर्वत्रच सुरु असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
संयुक्त राष्ट्र संघाच्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार पतींना आपल्या पत्नीकडून घरगुती अत्याचाराचा सर्वाधिक त्रास इजिप्तमध्ये होत आहे. येथील फॅमिली कोर्टाच्या आकडेवारीनुसार ६६ टक्के पतींना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो त्यामुळे ते घटस्फोटासाठी अर्ज करतात. याच यादीत युनायटेड किंगडमचा दुसरा क्रमांक आहे. तर भारताचा तिसरा क्रमांक आहे. भारतासारख्या परंपरागत समाजात ही आकेडवारी चमत्कारीक आहे. परंतू अनेक पुरुष आपल्या घरात गुपचूप अत्याचार सहन करीत असतात.
महिलाच नाही,तर पुरुषही होतात शिकार
सामान्यत: घरगुती हिंसाचाराचा अर्थ पतीद्वारे पत्नीवर हात उचलणे होय. परंतू या अहवालाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले असून हिंसा ही लिंग पाहात नाही. तो कोणाही द्वारा केलेली असू शकते. ती शारीरिक किंवा मानसिकही असू शकते. महिला देखील अनेकदा रागाने नियंत्रण मिळविण्यासाठी किंवा ताणतणावाने आपल्या पतीसोबत शारीरिक हिंसा करतात. समाजात या मुद्यावर उघडपणे कोणी बोलत नसल्याने हा मुद्दा बराच काळ दुर्लक्षित राहीला आहे.
UN गुडविल एम्बेसेडर एमा वॉटसन याने यांनी देखील आपल्या भाषणात सांगितले की जर आपण खरोखरच जेंडर इक्वालिटीच्या दिशेने जाऊ इच्छित आहोत तर हिंसा ही कोणा एका लिंगाची समस्या नाही. महिला सशक्तीकरण म्हणजे पुरुषांना कमजोर दाखवणे नव्हे, तर समान अधिकार आणि सुरक्षा देणे आहे. घरगुती हिंसाचार विरोधातील लढाई तोपर्यंत अधुरी जोपर्यंत पुरुषांच्या विरोधात होणाऱ्या हिंसेलाही तेवढ्याच गंभीरतेने घ्यायला हवे.
काळाने दृष्टीकोनात बदल-
युएनचा हा अहवाल समाजासमोर एक आरसा आहे. आपण हे स्वीकारले पाहिजे की पुरुषही घरगुती हिंसाचाराचे बळी असू शकतात आणि त्यांना महिलांइतकीच आधार, दया आणि न्याय मिळण्याची आवश्यकता असते. भारतासारख्या देशात, जिथे पुरुषांकडून नेहमीच मजबूत आणि धैर्यवान राहण्याची अपेक्षा केली जाते. तिथे पुरुषांचेही दुःख ऐकणे आणि समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. आता समाजाला आता लैंगिक भेदभावाच्या दोन्ही पैलूंना एकाच तराजूत तोलण्याची वेळ आली आहे.