‘एखाद्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला आय लव्ह यू म्हणणे म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे’- उच्च न्यायालय

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

 

एखाद्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला आय लव्ह यू म्हणणे म्हणजे लैंगिक अत्याचार होत नाही असं महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलं. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकल खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवलं या प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करत न्यायालयाने एका 27 वर्षाच्या व्यक्तीला निर्दोष मुक्त केलं.

नेमकं काय प्रकरण?
ही घटना नागपूरमधील असून ऑक्टोबर 2017 मध्ये घडली. एक 17 वर्षांची मुलगी कॉलेजमधून तिच्या घरी जात असताना एक मुलगा (त्यावेळी त्याचे वयही 17 वर्षे होते) तिच्याजवळ आला. त्या मुलाने मुलीचा हात पकडला आणि तिला आय लव्ह यू असं म्हटलं. त्या मुलीने या संदर्भात पोलिसामध्ये तक्रार केली. मुलीच्या तक्रारीवरून त्या मुलाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करून त्या मुलाला कलम 354A (लैंगिक अत्याचार) आणि 354D (पाठलाग करुन विनयभंग) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत दोषी मानलं. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं.

या प्रकरणी आपल्यावर सूडबुद्धीतून गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या घटनेचा कोणीही साक्षीदार नाही. तसेच आपण त्या मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला असल्याचा कोणताही पुरावा नाही असा दावा त्या व्यक्तीकडून करण्यात आला. या सर्व गोष्टी लक्षात घेता न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकल खंडपीठाने यावर सुनावणी केली आणि त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. केवळ मुलीचा हात पकडून आय लव्ह यू म्हटल्याने लैंगिक अत्याचार होत नाही असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *