पुण्यात पुन्हा हिट अँड रन! आलिशान कारची एका बाईकस्वाराला धडक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पुण्यातील प्रसिद्ध कोरेगाव पार्क परिसरामध्ये हिट अँड रनचा हा भयानक प्रकार घडला आहे. भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने एका बाईकस्वाराल धडक देत चिरडलं आणि त्या तरूणाला तसंच मृत्यूच्या दारात सोडून तो कारचालक तिथीन तोंड लपवून पळून गेला. या अपघातामध्ये 21 वर्षांच्या एका डिलीव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर गुरुवारी मध्यरात्री 1च्या सुमारास हा अपघात घडला. रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात घडला तेव्हा कारचालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कारचालकाचा शोध सुरू केला. अखेर अथक प्रयत्नांनी त्याला ताब्यात घेण्यात आलं. प्रदीप तयाल असे आरोपीचे नाव असून तो हडपसर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर तो फरार झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा काल 1 ते 1.30 च्या दरम्यान एबीसी रोडवरून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होता. त्याची आलिशान कार भरधाव वेगाने धावत होती. प्रथन त्याच्या कारने एका ॲक्टिव्हाला धडक दिली, त्यामध्ये तिघे जण किरकोल जखमी झाले. मात्र तरीही कारचालक थांबला नाही, तो तसाच वेगाने पुढे गेला आणि बाईकवरू जाणऱ्या रौफ याला जोरदार धडक दिली. तो गंभीर जखमी होऊ खाली कोसळला. पण त्याला मदत करायची सोडून कारचालक त्याला तेथेच जखमी अवस्थेत सोडून पळू गेला.

आसपासच्या लोकांनी तातडीने जखमी बाईकस्वाराला रुग्णालायत दाखल केले. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झालाय याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *