‘दोन कोटी रुपये न दिल्यास त्याला मारले जाईल’; सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. ही धमकी मुंबई वाहतूक पोलिसांना मेसेजद्वारे देण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने करोडोंची खंडणीही मागितली आहे. या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. याआधीही लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दोन कोटी रुपये न दिल्यास सलमान खानला मारले जाईल, असा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला देण्यात आला होता. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर वरळी जिल्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, वरळी वाहतूक पोलिसांना अज्ञात व्यक्तीने दोन धमकीचे संदेश पाठवले आहेत. वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 354 (2), 308 (4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी, मंगळवारी मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि दिवंगत बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांना धमकीच्या कॉल प्रकरणी नोएडा येथे एका 20 वर्षीय व्यक्तीला अटक केली. मोहम्मद तय्यब उर्फ गुरफान खान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला नोएडा येथील सेक्टर 39 येथून अटक करण्यात आली. धमकीशिवाय आरोपी मोहम्मद तय्यब उर्फ गुरफानने झीशान सिद्दीकी आणि सलमान खान यांच्याकडेही पैसे मागितले होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *