बहुतेक लोकांना गोड पदार्थ आवडतात. पण मिठाई कमी किंवा कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण मधुमेह होण्याचा धोका असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा गोड पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही सहज घरी बनवू शकता आणि खाऊ शकता कारण ते अत्यंत आरोग्यदायी तसेच चवदार आहे. या रेसिपीचं नाव आहे, गाजर बर्फी
गाजर बर्फी साहित्य
१/२ किलो किसलेले गाजर
१ कप साखर
१ कप दुध
१/२ कप बारीक रवा
१/२ कप मिल्क पावडर
१/२ चमचा वेलची पूड
सुक्यामेव्याचे काप आवडीनुसार
तूप
गाजर बर्फी कृती
१. प्रथम गाजर स्वच्छ धुवुन साले काढुन घ्या. कढईत रवा तूप न वापरता मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या व प्लेट मध्ये काढून घ्या.
२. सर्व गाजर किसुन घ्या. मिक्सर जार मधून जाडसर वाटून घ्या.
३. कढईत तीन,चार चमचे तुप गरम करुन त्यात गाजराचा किस घाला. याला छान सात,आठ मिनीटे परतुन छान वाफ येऊ द्या. आता यामध्ये दूध घालुन, पुर्ण दुध आटेपर्यंत शिजु द्या.
४. नंतर साखर घाला. साखर विरघळली की त्यात रवा, मिल्क पावडर घालून मिक्स करा व झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवून सर्व एकत्र चांगले शिजु द्या. छान घट्ट होउ द्या. शेवटी वेलची पूड घाला.
५. आता एका ताटाला किंवा टिनला तुपाने ग्रिसींग करुन हे मिश्रण त्यावर थापुन घ्या.त्यावर सुक्या मेव्याचे काप पसरवा आणि थंड झाल्यावर आवडेल त्या आकाराच्या वड्या पाडा. बर्फी तयार.