आरोपीला फाशी द्या नाहीतर, इथून हलणार नाही, बदलापुर रेल्वे स्टेशनवर पोलिसांवर दगडफेक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

Badlapur School Case: कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरचा अमानुष छळ करुन तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही मुली अवघ्या साडेतीन ते चार वर्षांच्या आहेत. त्यामुळे या घटनेबाबत प्रचंड संताप आणि चिड व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येने पालकवर्ग शाळेसमोर उभा राहिला आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले होते.

 

 

आता त्या पोलिसांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर शाळेकडून माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे. शाळा प्रशासनाने येऊन आमच्याशी बोलावं अशी मागणी पालकांनी केली आहे. ‘आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत’ अशी पालकांची भावना असून, त्यांनी शाळा प्रशासनाने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत

 

संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक

या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. यानंतर संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. तर पालकांकडूनही शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक केली. तसेच संस्था चालक, शिक्षकांचीही पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

 

तुमच्या भावना आम्ही समजू शकतो पण प्लीज ट्रॅकवरून बाजूला व्हा, पोलिसांची विनंती आंदोलकांनी धुडकावली

दरम्यान मंगळवारी सकाळपासून रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आले. त्यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेऊन सरकारपर्यंत तुमच्या भावना पोहोचवतो, असे सांगितले. आंदोलकांना हात जोडून विनंती करताना अनेक विद्यार्थी, आजारी रुग्णांची गैरसोय होत असल्याचे सांगत आपण ट्रॅकवरून बाजूला व्हावे, अशी विनंती शिसवे यांनी आंदोलकांना केली. मात्र आंदोलक ऐकायला तयार नव्हते. आरोपीला फाशी द्या, अशा जोरदार घोषणा आंदोलकांकडून सुरू होत्या.

 

अन् चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडांचा वर्षाव सुरू केला

आंदोलक ऐकत नसल्याचो पाहून पोलिसांनी काहीसा आक्रमक पवित्रा घेतला. त्याचवेळी चिडडेल्या आंदोलकांनी पोलिसांवर जोरात दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत एक महिला आणि एक पोलीस जखमी झाले आहेत. पोलीस लाठीचार्ज करताना संतप्त जमावाकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेक होत आहे. गेल्या सहा तासापासून रेल्वेस्टेशन ठप्प आहे.आंदोलकांना शांततेच आवाहन केल आहे.

 

बदलापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणात आंदोलकांची  गर्दी पांगविण्यासाठी आणि स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार विनंती करून आंदोलक माघार  घेत नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता  संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीनंतर पोलिसांनी काढता पाय घेतला आहे. दगडफेकीत तीन ते चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *