पोस्ट ऑफिसच्या योजनेत कमाईची जोरदार संधी! 115 महिन्यात पैसा डबल

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

प्रत्येकाला काही तरी कमाई व्हावी अशी अपेक्षा असते. प्रत्येक जण काही ना काही बचत करतो. बचतीतून चांगला परतावा मिळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये आजही भारतीय गुंतवणूक करतात. पोस्टाच्या अल्पबचत योजनांवर चांगले व्याज मिळतेच. पण या बचतीची सरकार हमी घेते. किसान विकास पत्र, KVP Scheme ही अशीच जोरदार योजना आहे. या योजनेत ग्राहकांना केवळ 115 महिन्यात पैसा डबल मिळतो. काय आहे ही योजना? कशी करता येईल गुंतवणूक?

पैसा दुप्पट करणारी योजना

कोणत्याही जोखि‍मेशिवाय तुम्हाला पैसा दुप्पट करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र, KVP ही जोरदार योजना आहे. या योजनेवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडलेल्या आहे. पारंपारिक गुंतवणूकदार या योजनेला महत्त्व देतात. या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यावर 115 महिन्यात रक्कम दुप्पट होते. तुम्ही कमीत कमी 1000 रुपयांपासून अनेक पट्टीत या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत जास्तीत जास्त किती पण रक्कम गुंतवता येते. त्याला मर्यादा नाही.

किती खाते येतील उघडता?

किसान विकास पत्र योजनेतंर्गत एकल अथवा दोन पद्धतीचे खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलाच्या नावाने या सरकारी योजनेत खाते उघडता येते. तर एक व्यक्ती किती पण खाते उघडू शकते. त्याची कोणतीची मर्यादा नाही. तुम्ही किसान पत्र योजनेतंर्गत कितीही खाती उघडू शकता. सध्या या योजनेवर सरकारकडून 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. दर तीन महिन्याला व्याजात बदल होतो.

पोस्ट ऑफिसमध्ये KVP, NSC खाते असे ऑनलाइन असे सुरू करा

पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा

‘जनरल सर्व्हिसेस’ वर जा. नंतर ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ वर जा आणि शेवटी ‘नवीन विनंती’ वर जा

NSC खाते उघडण्यासाठी, ‘NSC’ खात्यावर क्लिक करा. KVP खाते उघडण्यासाठी, ‘KVP खाते’ वर क्लिक करा

NSC खाते उघडण्यासाठी असलेली रक्कम जमा करा. योजनेतंर्गत, किमान 1000 अथवा 100 रुपयांच्या पटीत रक्कम जमा करा

पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक केलेले डेबिट खाते निवडा

अटी व शर्तीं वाचून क्लिक करा आणि स्वीकारा

ऑनलाइन खाते बंद करा

ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका आणि सबमिट बटण दाबा

दोन्ही खाते ऑनलाइन कसे बंद करावे

पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा

‘कॉमन सर्व्हिसेस’ अंतर्गत, ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’ > ‘नवीन विनंती’ वर क्लिक करा

NSC साठी ‘NSC अकाउंट क्लोजर’ आणि KVP साठी ‘KVP अकाउंट क्लोजर’ वर क्लिक करा

राष्ट्रीय बचत खाते आणि किसान विकास पत्राचे खाते जे बंद करायचे आहे, ते निवडा आणि पुढील प्रक्रिया करा


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *