खुशखबर! यंदा गुढी पाडव्यानिमित्त इंडिया यामाहाकडून ग्राहकांसाठी खास ऑफर्स

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

दरवर्षी मोठ्या उत्साहात महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा (Gudi Padwa) सण साजरा केला जातो. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना इंडिया यामाहा (Yamaha) मोटरसुद्धा या भागातील ग्राहकांसाठी आणलेल्या खास ऑफर्सच्या साथीने या उत्सवात सहभागी होत आहे. या पवित्र दिवशी यामाहाच्या खास डील्समुळं लोकप्रिय 150cc FZ मॉडेल रेंज व 125cc Fi हायब्रिड स्कूटर्सवर आकर्षक लाभ मिळणार आहे. यामुळं तुमच्या ड्रीम मशीनवर स्वार होत तिला घरी आणण्याची ही अगदी योग्य वेळ आहे.

यामाहाच्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध गुढी पाडवा स्पेशल ऑफर्स काय?
FZ-S Fi व FZ-X (149cc) मोटरसायकल्सवर 4000/- पर्यंतचा कॅशबॅक आणि 11111/- इतके कमी डाऊन पेमेंट
Fascino 125 Fi Hybrid (125cc) स्कूटरवर 3000/- चा कॅशबॅक व 6999/- इतके कमी डाऊन पेमेंट.
गुढी पाडव्याच्या निमित्ताने होणारी नवीन सुरुवात यामाहाच्या अव्वल श्रेणीतील, तुमच्या सवारीला उत्साह आणि उत्तम कामगिरीची जोड देणाऱ्या मोटरसायकल्स व स्कूटर्सच्या साथीने साजरी करा. आपल्या जवळच्या यामाहा डीलरशीपबरोबर संपर्क साधा आणि या उत्सवी ऑफरचा लाभ घ्या.

यामाहाच्या वैविध्यपूर्ण उत्पादनश्रेणीमध्ये YZF-R3 (321cc), MT-03 (321cc), YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc) सारख्या अव्वल दर्जाच्या बाइक्सचा समावेश आहे. त्याचबरोबर यामाहाकडे एरॉक्स 155 version S (155cc), एरॉक्स 155 (155cc), फॅसिनो S 125 Fi Hybrid (125cc), फॅसिनो 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc),आणि RayZR Street Rally 125 Fi Hybrid (125cc) यांसारख्या स्कूटर्सची श्रेणीही उपलब्ध आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *