आपल्याकडे आयफोन असावा असे प्रत्येकालाच वाटते. मात्र अॅपल कंपनीचे फोन फारच महागडे असल्यामुळे सामान्य व्यक्ती हे फोन घेऊ शकत नाही.मात्र आता आयफोन घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर आयफोनवर बम्पर सूट देण्यात आलेली आहे.
फ्लिपकार्ट आयफोन-15 वर मोठी सूट देण्यात आली आहे. अॅपल कंपनीच्या संकेतस्थवरील माहितीनुसार आयफोन-15 हा फोन 69900 रुपयांना म्हणजेच जवळपास 70 हजार रुपयांना तर आयफोन -15 प्लस हा फोन तब्बल 79900 रुपयांना म्हणजेच जवळपास 80 हजार रुपयांना मिळतो आहे.
मात्र फ्लिकपार्टवर आयफोन-15 हा फोन फक्त 58499 रुपयांना मिळतोय. म्हणजेच या फोनवर तब्बल 11401 रुपयांची सूट देण्यात आली आहे.
आयफोन 15 प्लस हे मॉडेलही अवघ्या 69999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच आयफोन 15 प्लस या मॉडेलवर फ्लिकपार्टवर तब्बल 15901 रुपयांची सूट देण्यात येत आहे.