विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,तिकीटाची किंमत होणार कमी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. चालू सप्टेंबर महिन्यात जेट इंधनाच्या (Fuel) किंमतीत घट झाली आहे. दोन महिन्यांच्या वाढीनंतर आज इमधनाचे दर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मुळाला आहे. त्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची तिकिटे स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

जेट इंधन दरात घट झाल्याने हवाई भाडे कमी होण्याची शक्यता बळावली आहे. जेट इंधन वाढल्याने विमान कंपन्यांचा खर्च वाढतो. त्यामुळे कंपन्या त्यांची हवाई तिकिट वाढवतात. जेट इंधनात कपात केल्यानंतर कंपन्यांना तिकीट दर कमी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात प्रमुख्यांने प्रवाशांना तिकिट दरात 4 हजारांची सूट मिळणार आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती 4,495.5 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

 

ऑगस्ट महिन्यातील आणि आत्ताचे दर

दिल्लीत एटीएफची किंमत 97,975.72 रुपये प्रति किलोलीटरवरून 93,480.22 रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे.

कोलकात्यात ATF ची किंमत 1,00,520.88 रुपये प्रति किलोलीटरवरून 96,298.44 रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती 4,222.44 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
मुंबईतील एटीएफची किंमत 91,650.34 रुपये प्रति किलोलीटरवरून 87,432.78 रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती 4,217.56 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

चेन्नईमध्ये ATF ची किंमत 1,01,632.08 रुपये प्रति किलोलीटर वरून 97,064.32 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती 4,567.76 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

देशांतर्गत विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधनावर कमी खर्च करावा लागणार आहे. आता अशा विमानांना दिल्ली विमानतळावर 39.68 डॉलर स्वस्त जेट इंधन मिळेल. आता ऑगस्टच्या तुलनेत किंमत कमी होऊन 852.12 डॉलर प्रति किलोलिटर झाली आहे. मुंबईत किमती 39.72 डॉलरने कमी होऊन सध्याची किंमती 851.34 डॉलर प्रति किलोलिटर दिसत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *