इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. आयटीबीपमध्ये 526 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया टेम्पररी स्वरुपात केली जाणार असून या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना कायमस्वरुपी नोकरीत संधी दिली जाई शकते. आयटीबीपीमध्ये ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना 15 नोव्हेंबरपासून 14 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येईल.
आयटीबीपीच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करणाऱ्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. पात्र उमेदवारांनी आयटीबीपीच्या वेबसाईटवर अर्ज सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्या पदासाठी किती जागांची भरती ?
उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण 92 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी 78 पुरुष उमेदवारांसाठी तर 14 महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना 35400 ते 112400 रुपये वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल. या पदासाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचं वय 20 ते 25 वर्ष असणं आवश्यक आहे.
हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदाच्या एकूण 383 जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 325 आणि महिला उमेदवारांसाठी 58 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 25500 ते 81100 रुपये वेतनश्रेणीनुसार पगार दिला जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18-25 वर्ष दरम्यान असावं.
कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदासाठी एकूण 51 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी 44 जागा पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत. 7 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्ष असणं आवश्यक आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना 21700 रुपये ते 69100 रुपये वेतनश्रेणीनुसार वेतन मिळेल.
आयटीबीपीच्या या भरतीप्रक्रियेबाबतची सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. ही जाहिरात आयटीबीपीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलं जाईल. या भरतीपैकी 10 टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उपनिरीक्षक पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अर्जाचं शुल्क म्हणून 200 रुपये भरावे लागतील. हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. महिला, माजी सैनिक, अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावं लागणार नाही.