गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या दरात घट झाली होती. त्यामुळेच सामान्यांनी दागिने खऱेदी करण्यासाठी सराफा बाजारात गर्दी केली होती. दरम्यान, आज गुरुवारी मात्र सोन-चांदीचा भाव वाढला आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 77803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचा भाव 550 रुपयांनी वाढला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील 500 रुपयांनी वाढून 71333 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा दर -0.89 टक्क्यांनी बदलला आहे. तर गेल्या महिन्याचा तुलन्यात सोन्याच्या दरात या महिन्यात 4.33 टक्क्यांची वाढ झाली आहे. साची हा धातू सध्या 95,200 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
दिल्लीमध्ये आज सोन्याचा भाव काय? (Gold Price Delhi)
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 77803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. बुधवारी हाच भाव 76493.0 रुपये होता. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव 75813 रुपये होता. दिल्ली शहरात चांदीचा भाव 95200 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. बुधवारी हाच दर 92500 रुपये प्रति किॅलोग्रॅम होता. गेल्या आठवड्यात चांदीची किंमत 92500 रुपये प्रति किलोग्रॅम होती.
चेन्नईमध्ये सोन्याचा भाव किती (Gold Price Chennai)
चेन्नई शहरात सोन्याचा भाव 77651 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. बुधवारी हाच दर 76341 रुपये होता. गेल्या आठवड्यात सोने 75661 रुपये प्रतिक 10 ग्रॅम होते. चेन्नईत चांदीचा भाव 103600.0 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. बुधवारी हाच भाव 101600 रुपये प्रति किलोग्रॅम होता.
मुंबईत सोन्याचा भाव काय? (Gold Price Mumbai)
मुंबई शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 77657 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. बुधवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 76347 रुपये तर गेल्या आठवड्यात 75667 रुपये होता. मुंबईत आज चांदीचा भाव 94500 रुपये प्रति किलोग्रॅमरवर पोहोचला आहे.
कोलकाता शहरात सोन्याचा भाव किती? (Gold Price Kolkata)
आज कोलकाता शहरात सोन्याचा भाव 77655 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. बुधवारी हाच भाव 76345 रुपयांवर तर गेल्या आठवड्यात हा भाव 75665 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर कोलकाता शहरात चांदीचा भाव 96000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. बुधवारी चांदीचा भाव 93300 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.