शहरातील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचा आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini khadse) यांचा पती प्राजल खेवलकर यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी, आरोपी अद्यापही अटकेत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्यातच, राज्य महिला आयोगाकडे प्राप्त तक्रारीनुसार प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी गंभीर आरोप करण्यात आला आहेत. यासंदर्भात महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी पुण्यात (Pune) पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली. तसेच, प्रांजल खेवलकर अनेक व्हिडिओमध्ये दिसत असून हे मोठं रॅकेट असल्याचंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.
राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे पोलिसांना सूचना दिल्या होत्या, त्यानुसार सानवी संस्थेचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. भीषण आणि भयावह अहवाल आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडीत छापा टाकत कारवाई करण्यात आली होती. प्रांजल खेवलकर आणि त्यांचा सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन कोकेन गांजा, 10 मोबाईल, हुक्का पॉट आणि अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. हडपसरच्या घरातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ आढळले होते. आरुष नावाने हा नंबर सेव्ह होता, अशी खळबळजनक माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
पिच्चरमध्ये काम देतो म्हणत मुलींना बोलावलं
लोणावळा येथे सगळ्यांना बोलण्यात आलं होत, प्रांजल यांनी मुलींना पिच्चरमध्ये काम देतो म्हणून बोलवले आहे. गोवा, लोणावळा, साकिनाका, जळगाव या ठिकाणी बोलवल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. या मुलींसोबत लैगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं असून अनैतिक मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यताही रुपाली चाकणकर यांनी वर्तवली आहे.
252 व्हिडिओ 1497 नग्न फोटो
मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ, 1497 फोटो नग्न फोटो आहेत. मुलींना विवस्त्र करुन नशेत त्यांचे घाणेरडे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. तसेच, साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे फोटो, व्हिडिओ आहेत. या मुलींना पटवण्यासाठी आरूष नावाचा माणूस ठेवला होता. चित्रपटात काम देऊन त्या मुलीना बोलवलं जात होत. यात मानवी तस्करी झाली आहे, त्यामुळे आता एसआयटी स्थापन कारणासंदर्भात पत्र दिल्याची माहितीही चाकणकर यांनी दिली. अनैतिक शोषण, मानवी तस्करी आणि महिलांचा अनैतिक शोषण केल्याच समोर आलं असून 28 वेळा रूम बूक केली होती.
देशातलं सर्वात मोठं रॅकेट?
याप्रकरणी, महिलांना कसं आणला, त्यांचा कसा वापर केला याची तपासणी होण गरजेचं आहे. मोबाईल आणि फोन कॉलची चौकशी करण्यात यावी. एका रेव्ह पार्टीसंदर्भात हे प्रकरण असलं तरी मानवी तस्करीचा प्रकार आहे. पुण्यात हा प्रकार असल्याने हे वाईट आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, केवळ पार्टीच्या नावाखाली ही तस्करी सुरू आहे. देशातलं सगळ्यात मोठं मानवी तस्करीचं हे रॅकेटू असू शकते, असेही चाकणकर यांनी म्हटलं.
व्हिडिओमध्ये प्रांजल खेवलकर
हे फार मोठं रॅकेट आहे, हे उघडकीस येईल, अनेक व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलींचा वापर केला गेला आहे.पीडित मुलींनी समोर येऊन तक्रार द्यावी, काही मुलींनी तक्रार दिली आहे. अनेक वर्षांपासून सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात असून लोणावळा, जळगाव, साकीनाका येथे हे सगळं प्रकरण सुरू असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.