14 ऑगस्ट बुधवारी रोजी इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शाळेच्या मुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिल्यानंतर शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. ही घटना जुलै महिन्याच्या अखेरीस घडली. मात्र, परंतु, इतक्या दिवस पीडिताने याबाबत कोणालाही कसे सांगितले नाही, आरोपी शिक्षकाने तिला कोणत्या प्रकारची धमकी दिली होती का? याचाही तपास केला जात आहे.
अल्पवयीन मुलीने आपल्या मुख्याध्यापकांना सांगितले की, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग सुटल्यानंतर आरोपी शिक्षकाने तिला हाक मारली होती. त्यानंतर मुख्याध्यापिकेने मुलीच्या पालकांना माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 च्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितले.