आजच्या आधुनिक युगात, ऑफिस संस्कृतीत अनेक बदल होत आहेत. कामाच्या ठिकाणी फक्त कामच नाही, तर संवाद, मूल्यव्यवस्था आणि मानसिक आरोग्यालाही तितकंच महत्त्व दिलं जातं.याच पार्श्वभूमीवर एक नवा आणि चिंताजनक ट्रेंड पुढे येतोय तो म्हणजे “Ghost Resignation”, विशेषतः Gen Z म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या पिढीत हा चर्चेत आहे.
Ghost Resignation” म्हणजे एखादा कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणाशीही न बोलता, एके दिवशी नोकरीवरून अचानक गायब होतो. ना मेल, ना कॉल, ना नोटीस – अगदी “घोस्ट” झाल्यासारखा!पूर्वी नोकरी सोडताना एक औपचारिक प्रक्रिया असायची. पण आता काही कर्मचारी थेट निघून जातात, आणि कंपनीला कळतंही नाही की त्यांनी नोकरी का सोडली.
Gen Z मध्ये हा ट्रेंड का वाढतोय? Gen Z ही पिढी कामाच्या ताणापेक्षा स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देते. जर ऑफिसचे वातावरण नकारात्मक असेल, तर ते तिथे थांबणं योग्य समजत नाहीत.
या पिढीला एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करणं जुनी गोष्ट वाटते. नवीन संधी मिळाल्यावर ते लगेच निर्णय घेतात, काही वेळेस कोणालाही न सांगता!Gen Z ला टेक्स्टवर बोलणं सोपं वाटतं, पण कठीण संवाद, जसं की राजीनामा देणं. या गोष्टी टाळण्याकडे कल असतो.स्वतंत्र काम, फ्रीलान्सिंग, युट्यूब, इत्यादी पर्याय Gen Z साठी अधिक आकर्षक वाटतात, जेव्हा ऑफिसमधील काम समाधान देत नाही, तेव्हा ते थेट निघून जातात.
Ghost Resignation ही फक्त एक ट्रेंड नाही, तर ही बदलत्या कार्यसंस्कृतीची खूण आहे. Gen Z कामाला “फक्त पगारासाठी” न पाहता, त्यात अर्थ, मूल्य, आणि आत्मसंतोष शोधते. हा बदल समजून घेणं ही काळाची गरज आहे, कर्मचार्यांनीही आणि कंपन्यांनीही.