पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका कारखान्यात माल उतरवताना काचा फुटून चार कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटना येवलेवाडी परिसरात एका काचेच्या कारखान्यात रविवारी दुपारी घडली .या कारखान्यात माल उतरवत असताना काचा फुटल्या त्यात 5 कामगार अडकले.पुण्यात येवलेवाडी येथे दुपारी दिड वाजेच्या दरम्यान एका कारखान्यात भीषण अपघात घडला.
या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन अडकलेल्या 5 कामगारांना बाहेर काढले. हे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असता चार जखमी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.