बीड मध्ये गांजा वाटपावरून चार न्यायाधीन बंदिवानात जोरदार राडा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा कारागृह (Beed Jail) सतत चर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या टोळीतील सदस्य सध्या याच कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तर दुसरीकडे बीड जिल्हा कारागृह कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. अशातच आता एक अज्ञात व्यक्तीने जिल्हा कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकला आणि यातील गांजा वाटपावरून चार न्यायाधीन बंदिवानात (Beed Crime) जोरदार राडा झाला. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी धाव घेत बंदिवानाच्या हातातील चेंडू ताब्यात घेतला. यावरून बंदिवानानी कर्मचाऱ्यानाच (Beed Jail Police) जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

दरम्यान, याप्रकरणी कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांसह कारागृह वरिष्ठांनी माहिती दिली. याच अनुषंगाने पोलीस आणि जिल्हाप्रशासनाकडून कारागृहात जाऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी गांजा बंदिवानानीच मागितल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी खोक्या भोसलेसह (Satish Bhosale) तिघा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खोक्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला जामीन देखील मिळाला होता. आता खोक्याचा नवा कारनामा समोर आल्याने खोक्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

याआधी कैद्याकडे आढळला होता गांजा
काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा कारागृहात गांजा आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज हे कर्तव्यावर असताना, बराक क्रमांक 7 मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षय ऊर्फ चिंटू मिठ्ठू गायकवाडच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या. त्यांनी गायकवाडची झडती घेतली असता, त्याच्या अंडरविअरमध्ये रबरी, फिकट आकाशी रंगाचा चिरलेला बॉल आढळून आला. त्या बॉलमध्ये गांजासदृश अंमली पदार्थ आढळला. त्यानंतर त्याच्या पँटच्या खिशातही झडती घेतली असता, हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट पदार्थ, हिरवट रंगाची फुले, बिया, बोंडे आणि काड्यांसह अंमली पदार्थसदृश मुद्देमाल सापडला. संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी अक्षय गायकवाडविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *