जम्मू- राजोरी जिल्ह्यातील कोटरंका उपविभागातील बद्दल गावात लग्नातून आणलेले अन्न खाल्ल्याने प्रकृती बिघडल्याने एकाच कुटुंबातील तीन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला. कुटुंबातील उर्वरित मुलावर माता आणि बाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आधीच आजारी असलेल्या आईवर जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. वडिलांचा राजौरी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला, दोन मुलींचा जम्मूला रेफर करताना वाटेतच मृत्यू झाला आणि एका मुलाचा माता बाल रुग्णालयात जम्मूमध्ये मृत्यू झाला.
दही आणि भात खाल्ले
आईच्या म्हणण्यानुसार सोमवारी एका नातेवाईकांकडे मुलीचे लग्न झाले. उरलेले अन्न घरी आणले. शुक्रवारी त्याच ठिकाणचे दही-भात खाल्ल्यानंतर सर्वांची तब्येत बिघडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत सध्या तिन्ही मुलांचे मृतदेह जीएमसी जम्मू आणि वडिलांचे राजौरी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.