प्रवाशांनी भरलेली बस 30 फूट खोल दरीत पडल्याने चार प्रवाशांचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मुंडक्कयम येथे केएसआरटीसीच्या बसला अपघात झाला. तसेच प्रवाशांनी भरलेली बस दरीत पडल्याने चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील मुंडक्कयम येथे KSRTC बसला अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस दरीत पडल्याने चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. अपघातग्रस्त बसमध्ये 34 प्रवासी आणि तीन कर्मचारी होते. सर्व प्रवासी मावेलीकारा भागातील रहिवासी होते. केएसआरटीसीची बस तामिळनाडूतील तंजावरला भेट दिल्यानंतर मावेलिक्कारा येथे परतत होती. हा अपघात आज सोमवारी सकाळी घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका वळणावर बसचे नियंत्रण सुटले आणि ती 30 फूट खोल दरीत कोसळली. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य करण्यात आले. तसेच एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *