बेळगाव शहरात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, एकाची स्थिती गंभीर आहे व तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची नावे संतोष कुराडेकर (४४), सुवर्णा कुराडेकर, आणि मंगला कुराडेकर अशी आहेत. सुनंदा कुराडेकर यांची अवस्था गंभीर आहे. ही दुर्दैवी घटना बेळगाव शहरातील जोशीमाळ परिसरात घडली. या घटनेमुळे जोशीमाळ परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime news in Marathi)
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास या कुटुंबाने विष प्राशन (Poision) केल्याची माहिती आहे. प्रकृती गंभीर असलेल्या मुलीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. ही घटना शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या कुटुंबाने एकत्रित आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या मृ्त्यूशी झुंज देत असलेल्या सुनंदा कुराडेकर यांच्याकडून पोलिसांना याबाबत माहिती मिळू शकते. मात्र, त्यासाठी त्या शुद्धीवर येणे गरजेचे आहे. तोपर्यंत पोलीस आपला तपास सुरु ठेवतील. या कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी 25 वर्षाची पत्नी मोनाली, सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षाची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केली. मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे समजतात पती म्हमाजी याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कासेगावातील शेतात जाऊन या विहिरीतून पाण्याचा उपसा करुन मोनाली आणि तिच्या दोन चिमूरड्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता.