उद्योजक गौतम सिंघानिया यांच्याकडून नवी मुंबईमधील व्यंकटेश्वर मंदिराची पायाभरणी,पहा व्हिडीओ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

नवी मुंबईच्या सेक्टर 12, नोडे उलवे या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात तिरूमला तिरुपती देवस्थानाचे श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिर उभा राहत आहे. या आधी जून 2023 मध्ये या मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले होते. आता रेमंड लिमिटेडचे सीएमडी गौतम सिंघानिया यांनी बुधवारी या भगवान व्यंकटेश्वर मंदिराची पायाभरणी केली.

प्रत्येकाला आंध्रप्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य नसते. अशा भाविकांना राज्यात याठिकाणी तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे. आजच्या पायाभरणी सोहळ्यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे कार्यकारी अधिकारी जे. श्यामला राव, टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, आयआरएस, व्यंकय्या चौधरी उपस्थित होते.

पहा व्हिडीओ:

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *