माजी पोलीस कर्मचाऱ्याने केली प्रियसीची निर्घृण हत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

महाराष्ट्रातील नागपुरातून एका माजी पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच प्रियसीची निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार निलंबित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच प्रेयसीची जोरदार झालेल्या वादानंतर हत्या करून तिचा मृतदेह नागपूर शहरातील एका बांधकामाधीन इमारतीच्या मागे असलेल्या सेप्टिक टाकीत टाकला. अधिका-यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि मृत महिला विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकारींनी सांगितले की, आरोपी नरेंद्र पांडुरंग डाहुले याला शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातून या घटनेप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर खून आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस दलात कार्यरत असलेल्या नरेंद्रला बडतर्फ करण्यात आल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले होते. तसेच मृत महिला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील रहिवासी होती. ती विवाहित होती. पोलिसांनी सांगितले की, डाहुले आणि महिला शाळेच्या काळात वर्गमित्र होते आणि ऑगस्टमध्ये फेसबुकच्या माध्यमातून त्यांची मैत्री पुन्हा वाढली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण जोडप्यामध्ये त्यांच्या भविष्याबद्दल जोरदार वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात डाहुले याने आपल्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केला. व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या मागे असलेल्या सेप्टिक टँकमध्ये मृतदेह फेकून दिला. तसेच तपासादरम्यान डाहुले याने महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *