महाराष्ट्रातील नागपूर शहरात एका कॅफे मालकाची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, हिरनवार टोळीतील आरोपींनी १५ एप्रिल रोजी कॅफे मालक अविनाश भुसारी यांची गोळ्या घालून हत्या केली होती आणि ते फरार होते.
तसेच पोलिस उपायुक्त म्हणाले की रात्री गोकुळपेठ परिसरातील भुसारीच्या कॅफेबाहेर टोळीने मालकावर हल्ला केला. त्याच्या मॅनेजरसोबत आईस्क्रीम खात असताना त्याला जवळून पाच गोळ्या घालण्यात आल्या.
पोलिसांनी विशेष पथके तयार करून संशयितांचा शोध घेतला. गुन्हे शाखेने काही आरोपींना नवेगाव धरण रेल्वे स्थानकातून आणि काहींना गोंदिया बस स्थानकातून अटक केली. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगतले.