अलिबाग (Alibaug) जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला आग ( fishing boat fire) लागल्याची घटना घडली आहे. भर समुद्रात बोटीने पेट घेतला आहे. या आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली आहे. बोटीवरील जाळी देखील जळाली आहे. बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती आहे. बोटीवरील सर्व खलाशी सुखरुप आहेत. आज सकाळी ही घटना घडली आहे.
पहाटे तीन ते चार वाजेचे दरम्यान बोटीला लागली आग
मिळालेल्या माहितीनुसार, साखर आक्षी गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनाऱ्यावर आणली आहे. सध्या आग विझविण्याचं काम सुरु आहे. साखर आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजेचे दरम्यान इलेक्ट्रिक शॉक सर्किट होऊन आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणी मदतीला कोस्ट गार्ड व नेवीच्या बोटी मदतीला पोहोचलेल्या असून सर्व खलाशी सुरक्षित आहेत. दरम्यान, समुद्रात अचानक बोटीने पेट घेतल्यामुळं खलाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पण आगीची माहिती मिळताच स्थानिकांच्या साथीनं बोट समुद्रकिनारी नेण्यात आली आहे.
भायखळामध्ये सॅलसेट बिल्डिंगला आग
भायखळा पूर्वेला असलेल्या न्यू ग्रेड इन्स्टा मिल जवळील सॅलसेट 27 या बिल्डिंगला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग लेवल वनची असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आला आहे. घटनास्थळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा काम सुरू आहे. सॅलसेट 27 ही रहिवासी इमारत असून 57 माळ्याची इमारत आहे. त्यातील 42 व्या माळ्यावर आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
समुद्रातच मच्छीमार बोटीला लागली आग, 18 ते 20 प्रवासी असल्याची माहिती, बोट जळून खाक
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सॅलसेट 27 या बिल्डिंगला आग नेमकी कशी लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत कोणत्याही प्रकारची जीवतहानी झाली नाही. सगळे सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मुंबईत अनेक ठिकाणी मोठ मोठ्या इमारतीला आग लागल्याच्या घटना घडताना दिसत आहे. अनेकदा शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.