उद्धव ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून एकूण 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र ठाकरे गट एकूण 22 जागा लढणार असल्याने अद्याप 5 जागांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली नाही. दरम्यान पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. उर्वरित जागांबद्दल चर्चेनंतर निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहेत. कोणत्या 5 जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही हे पाहूयात…
उत्तर मुंबई
उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते. फेब्रवारी महिन्यामध्ये विनोद घोसाळकरांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळेच घोसाळकरकुटुंबियांबद्दल सहानुभूती असून याचा विचार करता अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकरांनाही उमेदवारी जाहीर होऊ शकते.