बीडच्या ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; काय आहे प्रकरण?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

बीडच्या (Beed) अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळीत बीडमध्ये झालेल्या या गोळीबाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस सध्या अधिक तपास करतायत. बीड लातूर रोडवरील सेलू आंबा टोल नाक्यावर ही घटना घडली. या घटनेमध्ये दोन युवक जखमी झालेत.

संदीप तांदळे आणि अभय पंडित असं जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने पोलीसही सतर्क झाले आहेत. सध्य पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जातोय.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *