लेखणी बुलंद टीम:
उत्तर प्रदेशातील झाशी येथे शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली. शहरातील वैद्यकीय महाविद्यालयातील (Jhansi Medical College) बालकांच्या वॉर्डात (Infant Ward) आग लागली. बालकांच्या वॉर्डात असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. आग लागल्याचे सांगितले जात आहे. सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. मदतकार्याचे आदेश देण्यात आले आहेत. डीएमसह सर्व अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. 40 अर्भकांना वाचवण्यात यश आलं आहे. घटनेवेळी वार्डात 50 बालके होती.
ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट
ती गंभीर रित्या भाजली गेल्यची माहिती आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री वॉर्डात शॉर्टसर्किटमुळे ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेवेली उपस्थितांनी सांगितल्या प्रमाणे, आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या आणि मुख्य दरवाजा धुराच्या लोटाने व्यापला होता. त्यामुळे आत जाणं शक्य होत नव्हतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी वॉर्डच्या खिडकीच्या काचा फोडून मुलांना बाहेर काढले.
सेफ्टी अलार्ममध्ये बिघाड
दरम्यान, मेडिकल कॉलेज अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. कारण, या आग लागल्यानंतरही रुग्णालयातील सेफ्टी अलार्म वाजला नाही. अग्निशमन दलाचे जवान तोंडाला रुमाल बांधून बचाव कार्यात गुंतले होते. बाल वॉर्डात आग लागली तरी सेफ्टी अलार्म वाजला नाही. त्यामुळे रुग्णलय प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
नातेवाईकांचा टाहो
आगीची घटना घडताच रुग्णालयातील कर्मचारी शिशु वॉर्डकडे धावले. त्याशिवाय मुलांचे नातेवाईकही त्यांच्या मागे धावले. मात्र, आगीमुळे व धुरामुळे कोणीही प्रभागात जाऊ शकले नाही. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून खिडकीच्या काचा फोडून बचावकार्य सुरू केले.
10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, 40 अर्भकांना वाचवण्यात यश
https://twitter.com/ians_india/status/1857493979387895949