मुंबईतील घाटकोपर येथील निवासी इमारतीला आग, 13 जण जखमी, रुग्णालायत उपचार सुरु

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर मागसवर्गीय गृहनिर्माण संस्था रमाई निवास, रमाबाई आंबेडकर नगर येथे आग लागली. आग लागताच, तेथील रहिवाश्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ९० हून अधिक लोक सुखरुप बाहेर काढले. आगीत १३ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली. सर्व जखमींना राजावाडी मुन रुग्णालयातील डॉ.मैत्री यांच्या अपघाती वॉर्डात दाखल केले. त्यांच्यावर सद्या उपचार सुरु आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. हर्षा अनिल भिसे, स्वीटी संदीप कदम, जान्हवी मिलींद रायगावकर, प्रियंका काळे, जसिम सलीम सय्यद, ज्योती मिलींद रायगावकर, फिरोजा इक्बाल शेख, लक्ष्मी लक्ष्मण कदम, लक्ष्मण रामभाऊ कदम, मानसी श्रीवास्तव, अक्षरा सचिन शाह, दाते आणि अमीर इक्बाल खान असे जखमींची नावे आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *