जाणून घ्या, पोट साफ होण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावे? वाचा सविस्तर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सकाळी उठल्यावर योगासन केल्याने आपले शारीरिक सदृढ बनते तसेच मन देखील हेल्दी राहते. तर पाणी आपल्याला काही रोगांपासून दूर ठेवते. जर दोन्ही गोष्टी एकत्रित केल्यास आरोग्य तंदुरुस्त राहू शकते. पण कधी कधी सकाळी उठल्यानंतर पोट नीट साफ झाले नाही तर आळस, गॅस ॲसिडिटीची समस्या दिवसभर राहते. त्यात काम करताना तुम्हाला अजिबात फ्रेश वाटत नाही. यासाठी सकाळी योग्य प्रमाणात आणि योग्य स्थितीत पाणी पिणे आवश्यक आहे. सकाळी रिकाम्या पोटी गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने पोट सहज साफ होते. मात्र, पाणी पिताना बहुतांश लोक ही मोठी चूक करतात. काही लोक खुर्चीवर बसून पाणी पितात, तर काही जण उभे राहून पाणी पितात. ज्यामुळे पोटावर दबाव येत नाही आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही. चला जाणून घेऊया सकाळी उठल्यावर पाणी कसे प्यावे आणि किती पाणी प्यावे?

मलासन पोझिशनमध्ये बसून पाणी प्यावे?
मलासन (स्क्वॅट) पोझिशनमध्ये बसून सकाळी पाणी प्यायल्याने पोट सहज साफ होते. तर तुम्ही सकाळी उठल्यावर तोंड न धुता मलासन पोझिशनमध्ये बसून कोमट पाणी प्यावे. असे केल्याने रात्रभर तुमच्या तोंडात तयार होणारी लाळ जीवाणूंनी भरलेली असते. ते पोटाच्या आत जाते आणि यामुळे मलासन पोझिशनमध्ये बसून पाणी प्यायल्याने पोटावर दबाव येतो. या स्थितीत पोट साफ होते.

सकाळी उठल्यावर किती ग्लास पाणी प्यावे?
सकाळी किमान २-३ ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे तुमचे पोट भरले जाईल आणि पोटावर दाब तयार होण्यास सुरुवात होईल. रात्रभर पाणी न प्यायल्याने सकाळी पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर घोट घेत पाणी प्यावे. जर तुम्हाला जास्त पाणी पिता येत नसेल तर कमीत कमी 1 ग्लास कोमट पाणी प्या.

मलासन पोझिशनमध्ये बसून पाणी पिण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पोट साफ होते. पोट नीट साफ केल्यास आजार कमी होतात. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल आणि मुरुमांची समस्या दूर होईल. अशा प्रकारे तुम्हाला गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर होते. यामुळे पचनसंस्था मजबूत होते. शरीर लवचिक आणि ऊर्जावान होते. पाय मजबूत होतात आणि पोट बाहेर येत नाही.

 

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *