जाणून घ्या भारताकडून पाकिस्तानच किती नुकसान,काय- काय घडल?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर रात्रभर जोरदार गोळीबार केला. त्याला भारतानेही (India Attacks on Pakistan) चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या अक्षरशः भाजून निघाल्या. दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानचा रात्रभर तोफांचा भडीमार सुरू होता. तो अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलं. पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली. पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या कराची (Karachi Port) बंदरावर देखील भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले. 14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं. तसेच कराची बंदराचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितलं जात आहे. भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआऊट केलं. 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं.

पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला?
– भारतावर ड्रोन हल्ले केले, पण सगळे अपयशी ठरले
– लढाऊ विमाने पाठवली, एकही यशस्वी झालं नाही
– चार लढाऊ विमाने भारताने लगोलग पाडली
– कराची पोर्ट उद्ध्वस्त
– राजधानी इस्लामाबादेत हल्ले
– पंतप्रधानाच्या घराबाहेर हल्ले, बंकरमध्ये लपण्याची वेळ
– लाहोरमधील हल्ल्यांनी लाज काढली
– पाक सैन्यप्रमुखावरच देशद्रोहाचा खटला
– बलुचिस्तानने पाकिस्तानच्या 3 भागांवर कब्जा केला
– बलुचिस्तानातील चौक्या सोडून पळून जाण्याची वेळ

भारतानं पाकिस्तानचं सर्वाधिक ताकदीचं लढाऊ विमान पाडलं-
भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवलीय. भारतानं पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं गारद केली. चीननं दिलेले पाकिस्तानचे दोन जेएफ 17 आणि अमेरिकेच्या एका एफ 16 विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्ष्यभेद केला. भारतानं तीन विमानं पाडल्याची कबुली पाकिस्ताननंच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलीय. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. एफ 16 विमानं अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेत.

तुर्कीचे कार्गो विमान कराचीत, ड्रोन पुरवल्याची शक्यता-
भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा मित्र तुर्की मदतीला आल्याचं चित्र आहे. पाकिस्तानमधील कराची विमानतळावर तुर्कीचे एक कार्गो विमान उतरले आहे. जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन मदत पाठवल्याचा दावा केला जात असला तरी भारत विरोधी लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला मदत पुरवल्याची खात्रीलायक माहिती आहे. एवढी वाताहत झाल्यानंतरही पाकिस्तानची कुरापत करण्याची सवय काही गेली नसल्याचं यावरून दिसतंय.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *