लेखणी बुलंद टीम:
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या काटोलमध्ये देशमुख यांच्या गाडीवर काही लोकांनी दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख जखमी झाले आहेत. माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले
नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातील नरखेड येथून सभा संपवून माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख काटोलच्या दिशेने येत असताना काटोल जलालखेडा रोडवर गाडीवर कोणीतरी दगडफेक केली, अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली, त्यांच्यावर काटोल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे महाविकास आघाडीच्या वतीने नरखेड येथे निवडणूक लढवत आहेत.