मुंबई-रत्नागिरी- गोवा महामार्गावर असलेल्या निवळी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे.यात मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात झाला आहे. यात काही प्रवासी देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातात LPG टँकरचामधून गॅस लीक होत असल्याचे समोर आले असून बाव नदीजवळील काही घरांना आग लागल्याची घटना घडली आहे.तर, या आगीत दोन गाड्या आणि एक गोठा जळून खाक झाला आहे. सोबतच गोठयातील जनावर ही जखमी झाले आहे.
LPG टँकरमधून गॅस गळती झाल्याने आंब्याची कलम देखील जळून खाक झाली आहे.परिणामी या परिसरातील मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली असून सध्या लीक झालेला गॅस आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.