संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात कोल्हार-घोटी राज्यमार्गावर आज रविवारी (दि. 15) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला.शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्स आणि आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली.या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अपघात इतका भीषण होता की, ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघातामुळे कोल्हार-घोटी राज्यमार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.