प्रसिद्ध बॉलीवूड आणि हरियाणवी गायक राहुल फाजिलपुरिया वर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

गुरुग्राममध्ये, प्रसिद्ध बॉलीवूड आणि हरियाणवी गायक राहुल फाजिलपुरिया वर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात राहुल फाजिलपुरिया थोडक्यात बचावला. राहुल फाजिलपुरिया हा प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवचा मित्र आहे आणि एल्विश यादवसह त्याचं नाव सापाच्या विष आणि गोळीबाराच्या प्रकरणांमध्येही आलं होतं. राहुलवर हा हल्ला गुरुग्रामजवळील बादशाहपूर एसपीआरमध्ये झाला. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि अधिकारी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी पुरावे गोळा करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल त्याच्या फाजिलपुरिया गावाजवळून जात होता. तो गुरुग्राममधील बादशाहपूर सदर्न पेरिफेरल रोडवरून जात होता. त्यावेळी मागून काही हल्लेखोर टाटा पंच कारमधून आले आणि त्यांनी राहुलच्या कारवर गोळीबार सुरू केला. राहुलवर हल्ला झाल्याचं लक्षात येताच त्याने ताबडतोब गाडी वेगाने चालवण्यास सुरुवात केली. राहुल हल्ल्यातून थोडक्यात बचावला.

काही दिवसांपूर्वी त्याला हरियाणा पोलिसांनी सुरक्षा दिलेली

काही दिवसांपूर्वी राहुल फाजिलपुरियाला हरियाणा पोलिसांची सुरक्षा होती. गायकाच्या सुरक्षेसाठी दोन हरियाणा पोलिस कर्मचारी तैनात होते. धमक्या मिळाल्यानंतर राहुलने पोलिसांकडे सुरक्षा मागितली होती. काही दिवसांपूर्वी हरियाणा पोलिसांनी सुरक्षा मागे घेतली होती आणि आता त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी पुरावे गोळा करत आहेत.

राहुल फाजिलपुरिया हा गुरुग्राममधील एका लहानशा गावातील फाजिलपूर झारसा येथील रहिवासी आहे. या गायकानं २०२४ मध्ये लोकसभा निवडणूकही लढवली होती. त्यानं दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्ष (जेजेपी) पक्षाच्या तिकिटावर गुरुग्राममधून निवडणूक लढवली होती. पण राहुल ही निवडणूक हरला.

कॅन्सरची झुंज ठरली अपयशी, लोकप्रिय अभिनेत्रीचं वयाच्या ३१व्या वर्षी निधन; शेवटच्या क्षणापर्यंत शूटिंगमध्ये होती व्यग्र

व्यापारी कुटुंबातील असलेल्या राहुल फाजिलपुरियाला ‘कपूर अँड सन्स’ चित्रपटातील ‘लडकी ब्युटीफुल’ या गाण्यानं आणि ‘शादी में जरूर आना’ मधील ‘पल्लो लटके’ या गाण्यांनी बॉलिवूडमध्ये बरीच ओळख मिळाली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *