कॉमेडियन सुनील पॉल यांचे काही दिवसांपूर्वी अपहरण (Sunil Pal Kidnapped) करण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता मुश्ताक खान (Mushtaq Khan Kidnapped)यांच्या अपहरणाची माहिती समोर येत आहे. मेरठ हायवेवरून अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्यांचेही अपहरण सुनील पॉल यांच्या अपहरणाप्रमाणेच घडले होते. या प्रकरणी मुश्ताक खान यांनी बिजनौरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.
सुनील पॉल यांच्याकडून 8 लाखांची खंडणी
7 डिसेंबर रोजी सुनील पॉल याच्या अपहरणाची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली होती. या विरोधात सुनील पाल यांनी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. नंतर हा एफआयआर तपासासाठी मेरठला वर्ग करण्यात आला. हा एफआयआर 5 ते 6 अज्ञात लोकांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 8 लाखांची खंडणी वसूल केली. 2 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 ते 3 डिसेंबरच्या रात्री 8 च्या दरम्यान त्यांचे अपहरण झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
20 नोव्हेंबर रोजी अपहरण
अभिनेता मुश्ताक खान यांचे 20 नोव्हेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी बिजनौर पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. एफआयआरनुसार, दिल्ली-मेरठ महामार्गावरून त्यांचे अपहरण करण्यात आले. मुश्ताक खानचे इव्हेंट मॅनेजर शिवम यादव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.