पटनामध्ये खळबळजनक घटना!  भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

बिहार राज्यातील आलमगंज क्षेत्राच्या बजरंगपुरीजवळ आरोपींनी मंगळवारी रात्री दूध बूथ संचालक 50 वर्षीय भाजप नेता अजय शाह यांची गोळी झाडून हत्या केली आहे. यानंतर या परिसरात एकच गोंधळ झाला. प्राथमिक चौकशीमध्ये पोलीस हत्येचे कारण जमीन वाद असे सांगत आहे. घटनस्थळी पोहचलेले पोलीस चौकशी करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बजरंगपुरी मध्ये अजय साह यांचे कुटुंब राहते व घरातच त्याचे दुधाचे दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री दहा वाजता दूध बूथ वर अजय शाह बसले होते. दोन तरुण तिथे पोहचले. व अचानक अजय शाह यांच्यावर गोळ्या झाडू लागले. ज्यामुळे ते खाली कोसळले.

कुटुंबाने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले पण नालंदा मेडिकल कालेज रुग्णालयामध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *