बिग बॉसच्या टॉप 6 स्पर्धकांमध्ये बाजी मारत सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. तसेच निक्की तांबोळी ही टॉप 3 मध्ये येऊन तिला घरातून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर निक्कीने इन्स्टाग्रामवर तिच्या ब्रॉडकास्ट चॅनलवरुन तिच्या चाहत्यांसाठी एक मेसेज शेअर केलाय. ट्रॅाफी जरी त्याच्याकडे असली तरीही धमाका माझ्याच नावाचा सुरु असल्याचं निक्कीने म्हटलं आहे.
निक्कीने काय म्हटलं?
निक्कीने म्हटलं की, हॅलो, मी निक्की तांबोळी. तुम्हाला सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की, तुम्हाला मला एवढी मतं दिलीत त्यासाठी खूप आभार.. तुम्हीच मला बिग बॉस मराठीचं सेकंड रनर अप केलंत. या सीझनमध्ये मी तुमचं मनापासून मनोरंजन केलंय. तुम्हीच माझे डायलॉग एवढे फेमस केलेत. यापुढेही मी असंच काम करत राहीन.. माझ्या नवीन प्रोजेक्टविषयीही मी तुम्हाला माहित देत राहीन.. माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप प्रेम… आय लव्ह यू.. तुम्हा सगळ्यांसाठी बाई… हा काय प्रकार…
पुढे तिने सूरजच्या विजयावर बोलताना निक्कीने एक खास मेसेज तिच्या चाहत्यांसाठी शेअर केलाय. यामध्ये तिने म्हटलं की, ट्रॉफी जरी त्याच्याकडे असली तरीही धमाका फक्त माझ्याच नावाचा सुरु आहे. तुम्हाला काय वाटतं खरं कोण जिंकलं असेल..?