एकेक ‘लाडकी बहिण’ आज बदलापूरमधल्या लेकींच्या वेदनेनं कळवळतेय… ,बदलापूरच्या घटनेवर किरण मानेंची संतप्त प्रतिक्रिया

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेनंतर बदलापूरकरांनी काल रस्त्यवर उतरत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं. रेल्वे ट्रॅकवर उतरत बदलापूरकरांनी रेलरोको आंदोलन केलं. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. सोशल मीडियावरही याबाबतच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारांनी याबाबत आपली मतं व्यक्त केली आहेत. अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहित घटनेचा निषेध केला आहे.

 

किरण मानेंची प्रतिक्रिया
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी बदलापूर घटनेवरून सरकार आणि गृहखात्याला काही प्रश्न विचारले आहेत. लाडकी बहीण योजनेचा दाखला देत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘ती’ स्त्रित्वाच्या सुरक्षिततेपेक्षा तुम्ही फेकलेल्या दिड हजार रुपड्यांना भुलेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखलेलं नाही, असं म्हणत किरण माने यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

किरण माने यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जनतेचा काळीज पिळवटणारा आक्रोश ऐका! क्रूर आणि कोडग्या सत्ताधार्यां नो…जेव्हा एका लहान लेकरावर बलात्कार होतो ना, तेव्हा ती जखम आणि ती वेदना प्रत्येक स्त्रीला होते. महाराष्ट्रातल्या घराघरातली एकेक ‘लाडकी बहिण’ आज बदलापूरमधल्या लेकींच्या वेदनेनं कळवळतेय… या माताभगिनीच्या काळजात खदखदणार्याा या वेदनेची आग तुमच्या भ्रष्ट सरकारची राखरांगोळी करून टाकणार… ‘ती’ स्त्रित्वाच्या सुरक्षिततेपेक्षा तुम्ही फेकलेल्या दिड हजार रुपड्यांना भुलेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखलेलं नाही. मेंदूत कोरुन ठेवा, जनतेचा हा उद्रेक तुम्हाला नेस्तनाबूत करणार, असं किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

खरंतर घटनेचं गांभीर्य एवढं आहे की घटना घडलेल्या दिवसापासून एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि प्रशासन बदलापूरमध्ये तळ ठोकून बसायला हवं होतं. पण… इव्हेन्ट महत्त्वाचा होता ! कुणीही फिरकलं नाही. तब्बल चार दिवसांनी फाॅरमॅलिटी म्हणून मुख्याध्यापिकेला निलंबीत केलं, वर्गशिक्षीकेला नोकरीवरून काढलं आणि बलात्कार्याणचे शाळेबरोबर असलेले काॅन्ट्रॅक्ट रद्द केलं… व्वा ! मुलींना न्याय मिळावा म्हणून आज रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करणार्याब भावांवर, माताभगिनींवर अमानुष लाठीचार्ज केला गेला. नोट माय वर्डस्…या कोडग्या आणि नालायक राज्यकर्त्यांना तमाम महाराष्ट्रातल्या लहान लेकीबाळींचा तळतळाट लागणार आहे!, असंही किरण माने यांनी म्हटलं आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *