“धुळ्यातील वोट जिहादमुळे चार हजार मतांनी पराभव झाला. आता जागे झालो नाही, तर..”:देवेंद्र फडणवीस

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

“महाराष्ट्राच्या निवडणुकीत मोदींच्या प्रचाराची सुरुवात खान्देशातील धुळ्यात होतेय, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ही सुरुवात धुळ्यातून यासाठी केली, कारण मोदींच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात जे काम झालं, त्यामुळे पुढ्च्या पाच वर्षात धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर 1 जिल्हा होणार आहे. आज आपण पाहतोय, ज्या प्रकारे सुलवाडे-जामफळच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या प्रत्येक शेतीला पाणी जातय. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलय. अक्कलपाडा धरणाची उंची वाढवून त्याठिकाणी धुळे शहराला पिण्याच्या पाण्याची कधीच टंचाई भासणार नाही अशी काम होत आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते धुळ्यात प्रचारसभेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा धुळ्यामध्ये झाली.

“मोदींच्या नेतृत्वाखाली मनमाड-इंदूर रेल्वेसेवेच्या माध्यमातून एक अशा प्रकारच सेंटर धुळ्यात तयात होतेय. मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर, धुळे-मनमाड रेल्वे या सगळ्याचा एकत्रित विचार केला, तर इंडस्ट्रीज लॉजिस्टिक सेंटर कुठलं असेल, तर धुळे जिल्हा असेल. मोदींनी सहा राष्ट्रीय महामार्ग धुळ्याला दिले” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “धुळे जिल्हा 100 टक्के रिझल्ट देणार. पाचही जागा महायुतीच्या निवडून येणार. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार लाडक्या बहिणींना मदत करतय. मुलींना मोफत शिक्षण, मोदींच्या नेतृत्वाखाली लखपती दीदी या योजना सुरु आहेत. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात 8 हजार रुपये पीक विम्याची योजना सुरु आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करुन सरकारने शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्ती केली. पुढच्या पाचवर्षांसाठी वीज बिलातून मुक्ती सरकारने दिलीय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कर्जमाफीच्या विषयावर फडणवीस काय म्हणाले?

“तुमच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याशिवाय MSP पेक्षा भाव कमी झाल्यास भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

वोट जिहादमुळे 4 हजार मतांनी पराभव

“एकीकडे आम्ही विकास करतोय. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन महाराष्ट्र पुढे नेतोय. दुसरीकडे आमच्या विकासाला उत्तर देता येत नाही, म्हणून आमच्या विरोधकांनी रणनिती आखली आहे. धुळ्यात ते वोट जिहाद करतायत. आम्ही लोकसभेला धुळ्यात 1 लाख 90 हजार मतांनी पाचही मतदारसंघात पुढे होतो. पण मालेगाव सेंट्रल आणि धुळ्यातील वोट जिहादमुळे चार हजार मतांनी पराभव झाला. आता जागे झालो नाही, तर नेहमीसाठी झोपावं लागेल. ही निवडणूक जागं होण्याची आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *