पूर्व परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याबद्दल पवई पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोपींनी मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशांचे उल्लंघन केले होते. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे, मुंबई पोलिस आयुक्तांनी शहरात अनधिकृत ड्रोन उडवण्यावर बंदी घातली आहे
पवई परिसरातील साकी विहार रोडवर लोकांनी आकाशात एक ड्रोन पाहिला, ज्यामुळे तेथील लोक घाबरले. लोकांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून याची माहिती दिली आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. तपासात असे दिसून आले की हा ड्रोन एका 23 वर्षीय तरुणाचा होता आणि त्याच्याकडे त्याचा परवानाही नव्हता.पोलिसांनी ड्रोनच्या मालकाची चौकशी केली तेव्हा असे आढळून आले की मूळचा हैदराबादचा रहिवासी असलेला 23 वर्षीय तरुणाने हा ड्रोन एक वर्षापूर्वी खरेदी केला होता.
तरुणाने पोलिसांना सांगितले की, ड्रोन तुटला असून तो त्याची दुरुस्ती करत होता. चाचणीसाठी त्याने ड्रोन उडवला होता.तो चुकून जास्त उंचीवर गेला. आजूबाजूच्या लोकांना संशयास्पद ड्रोन बघितल्यावर ताबडतोब पोलिसांना कळविले. नंतर हे प्रकरण उघडकीस आले.
चौकशीनंतर पवई पोलिसांनी तरुणा विरुद्ध परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. 4 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी ड्रोन, मायक्रोलाईट विमाने, गरम हवेचे फुगे आणि पॅराग्लायडिंग यासारख्या गोष्टींवर महिनाभर बंदी घातली होती.तरुणाकडे ड्रोनचा परवाना नव्हता.