थंडी घालवण्यासाठी दिवसातून 4-5 कप चहा पिता? तर सावधान! वाचा सविस्तर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

थंडीत छान आल्याचा चहा कुणाला नाही आवडणार. त्यात काही लोक वेलची घालून चहा करतात. असा चहा वारंवार घ्यावा वाटतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, अतिरिक्त चहा किंवा प्रमाणापेक्षा अधिक चहा घेणे धोक्याचे ठरू शकते, आज याचविषयी जाणून घेऊया.

सकाळी उठण्यापासून दिवसभराचा थकवा दूर करण्यापर्यंत चहा हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जास्त चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकते? याविषयी पुढे जाणून घेऊया.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही दिवसातून 4-5 कप किंवा त्यापेक्षा जास्त चहा प्यायला तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया जास्त चहा प्यायल्याने आपल्या शरीरात कोणते बदल होऊ शकतात.

जास्त चहा पिण्याचे तोटे

चहामध्ये कॅफिन असते, जे मर्यादित प्रमाणात उर्जा देण्यास मदत करते. परंतु जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने निद्रानाश, अस्वस्थता आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात.

पोटातील आम्ल वाढू शकते

रिकाम्या पोटी किंवा वारंवार चहा प्यायल्याने पोटातील आम्ल वाढू शकते, ज्यामुळे पोटदुखी, अ‍ॅसिडिटी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. काही प्रकरणांमध्ये, यामुळे अल्सर देखील होऊ शकतो.

चहामध्ये टॅनिक अ‍ॅसिड

चहामध्ये टॅनिक अ‍ॅसिड आढळते, जे शरीरातील लोहाचे शोषण कमी करते. विशेषत: ज्यांना आधीच अ‍ॅनिमियाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी जास्त चहा पिणे धोकादायक ठरू शकते.

कॅल्शियमचे प्रमाण कमी होते

जास्त चहा प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. दीर्घकाळ असे केल्याने ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.

तज्ज्ञांच्या मते दिवसातून 2-3 कप चहा पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय चहा पिण्याची वेळही महत्त्वाची असते. रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा आणि खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नका.

पर्याय काय आहेत?

तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल आणि ती कमी करायची असेल तर तुम्ही आले हर्बल टी, ग्रीन टी किंवा गरम पाण्याचा पर्याय निवडू शकता. यामुळे तुमचे आरोग्य तर टिकून राहीलच, शिवाय थंड हवामानातही उबदारपणा मिळेल.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *