आटपाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा पोलीस प्रशासनाने काढल्याने भीम सैनिकाकडून रास्ता रोको आंदोलकावरच गुन्हा दाखल केल्याने महाराष्ट्रभर भीम सैनिकाकडून निषेध
आटपाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा पोलीस प्रशासनाने काढल्याने भीम सैनिकाकडून रक्षक की भक्षक शंका व्यक्त केली आहे .
आटपाडी येथे दोन दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बसविण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा पोलीस प्रशासनाने काढून घेतला होता. असा आरोप भीम सैनिकानी केला आहे . आटपाडी शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा, आटपाडी बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा तसेच आबानगर चौक येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. हे सर्व पुतळे गनिमी काव्याने बसविण्यात आले होते. शहरात प्रमुख महापुरुष यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत परंतु फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नव्हता. पण गोपनीय प्रकारे पोलीसकडून काडण्यात आला होता पण भीम सैनिक नाराजी पोलीस प्रशासनावर घोषणा देत आंदोलन केले . भीम सैनिक गाफील न राहत ठाम राहिले व पुन्हा चोकात अर्धाकृती पुतळा लावला त्या वेळेस भीम सैनिक , महिला व लहान मुलांसह आनंदाचे अश्रु अनावर झाले.
पोलीस प्रशासनाकडून भीम सैनिकावर जमाव व रास्ता रोको प्रकरणी ४७ नागरिकांवर गुन्हा दाखल झाला असून २५ अनोळखी लोकांवर कारवाही केली आहे . गुन्हा दाखल झालेल्या मध्ये आरपीआय जिल्हाध्यक्ष यांच्यासह स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचाही समावेश आहे.