सुषमाताई आंधरेना एकटं समजू नका! त्या आंबेडकरी पहिल्या नंतर पक्षाच्या आहेत!त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याचा विचार मनात आणू नका, पँथर इशारा आहे, तुमचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू! – दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना
सुषमाताई अंधारेना एकटं समजू नका! आंबेडकरी चळवळीत त्यांचं मोठं योगदान आहे. प्रस्तापित राजकारण्यांनी दलितांच्या या बहिणीला टार्गेट करू नये. पँथर इशारा आहे त्या बांडगुळ मंडळींना तुमचा बंदोबस्त तुमच्या भागात येऊन करायला जास्त वेळ लागणार नाही. पँथर सुषमाताईसोबत आहे हा गर्भित इशारा देतोय. त्यांच्या केसाला धक्का लावण्याचा विचार जरी केला ना तरी कायमस्वरूपी बंदोबस्त करू. पोलिसांच्या छावणीत, सत्तेच्या बळावर धमक्या देऊ नका तुमच्यात दम असेल तर स्वतः भिडा… यंत्रणांचा वापर गरिबांसाठी करा, विरोधकांना संपवण्यासाठी त्यांना धमकवण्यासाठी काय करता? यंत्रणा हुकुमशाही गाजवायला लागते हे सिद्ध झालं. आंबेडकरी चळवळीतील आमच्या बहिणीच्या डोळ्यात आम्ही आज पाणी पाहिले. आम्ही जिवंत असताना जिजाऊ, रमाई, सावित्री, अहील्याच्या लेकीना रडाव लागत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. तात्काळ कट थांबवा अन्यथा पँथर स्टाईल उत्तर देऊ!