लेखणी बुलंद टीम:
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यांनी वडिलांच्या हत्येवर राजकारण करू नये, अशी विनंती केली आहे. मला आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय हवा आहे, असे देखील ते म्हणाले आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि आमदार जिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नये असे सांगितले. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे!” बाबा सिद्दीकी यांची नुकतीच हत्या झाली असून ज्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार जिशान सिद्दीकी यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. तसेच, या हत्येबाबत जिशान सिद्दीकी यांनी काही माहिती पोलिसांना सांगितल्याचे समजते. तसेच वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे जिशान बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात पोहचले. या भेटीदरम्यान जिशानने पोलिसांना या हत्येमागील संभाव्य कारणांची माहिती दिली. यादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने जीशानला तपास कुठपर्यंत पोहोचला याची माहिती दिली.