‘डॉली चायवाला’ चा राजकारणात प्रवेश? नागपूरात भाजप रॅलीत उपस्थित

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तारीख आता जवळ आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यक्त आहेत. प्रचारासाठी अनेक नेते सेलिब्रिटींची मदत घेत आहेत. असेच दृश्य गुरुवारी नागपुरात पाहायला मिळाले. नागपूर पूर्व येथील भाजप (BJP) उमेदवाराच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार सभेला प्रसिद्ध डॉली चायवाला (Dolly Chaiwala) उपस्थित होता. प्रचारादरम्यान डॉली चायवाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नागपूरचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासोबत दिसला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशा परिस्थितीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सेलिब्रिटींची मदत घेत आहेत. भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डॉली चायवालासोबतचा फोटो शेअर केला आहे.

डॉली चायवालासोबतचा फोटो शेअर करताना भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी लिहिले आहे की, ‘नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पन्ना आणि पन्ना समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. उत्साही कार्यकर्त्यांनी भाजपच्या भव्य विजयासाठी मनापासून काम करण्याचा संकल्प केला. यावेळी भाजपचे उमेदवार श्री कृष्णा खोपडे जी यांच्यासह पक्षाचे अनेक सदस्य उपस्थित होते.’

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात एकाच वेळी मतदान होणार आहे. त्याच वेळी, मतदानानंतर 3 दिवसांनी 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांची पोस्ट:


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *