डॉक्टरकडून ११ कोटी रुपयांची खंडणी,नाहीतर गॅस सिलिंडरने रुग्णालय उडवून देण्याची दिली धमकी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एका व्यक्तीने डॉक्टरकडून ११ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल आणि जमिनीचा व्यवहार न केल्यास गॅस सिलिंडर भरलेल्या वाहनाने त्याचे रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने डॉक्टर यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून ही धमकी दिली. तक्रारीवरून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी याने डॉक्टर यांना व्हॉट्सअॅपवर धमकीचे संदेश पाठवले. हे प्रकरण २०१७ मध्ये झालेल्या एका जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित असून ज्या जमिनीवर आरोपीचा आधीच दावा होता ती जागा डॉक्टर यांनी खरेदी केली होती.

डॉक्टर यांनी या संदेशाला प्रतिसाद दिला नाही. यामुळे आरोपी संतापला. त्याने गॅस सिलिंडरने भरलेल्या वाहनाने रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिली. डॉक्टर यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. व पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *