तुम्हाला माहीत आहे का सर्जरी करताना हिरव्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

जगभरात विविध क्षेत्रातील लोकांसाठी वेगवेगळे ड्रेसकोड आहे. भारतात वकिलांसाठी काळा कोट, पोलिसांसाठी खाकी वर्दी, तर डॉक्टरांसाठी पांढरा कोट असा ड्रेसकोड पाहायला मिळतो.

मात्र, तुम्ही जर कधी लक्ष दिलं असेल, तर रुग्णालयात डॉक्टर सफेद रंगाचा कोट वापरतात. पण ओपीडीमध्ये रुग्णाच्या चेकअपसाठी जाताना आणि शस्त्रक्रियेच्या वेळी ते हिरव्या रंगाचे कपडे वापरतात. यामागचं कारण जाणून घ्या.

एका प्रभावशाली डॉक्टरने 1914 मध्ये हिरव्या रंगाचे कपडे घालण्याची सुरुवात केली होती.

आजही बहुतेक डॉक्टर हिरव्या कपड्यांमध्येच शस्त्रक्रिया करतात. मात्र, अजूनही काही डॉक्टर पांढऱ्या आणि निळ्या कपड्यांमध्ये शस्त्रक्रिया करतात.

हिरव्या रंगाचा वापर करण्यामागे शास्त्रीय कारणही आहे. हिरवे कपडे वापरण्याचा फायदा काय आणि त्यामागे विज्ञान जाणून घ्या

हिरव्या रंगाच्या कपड्यांमध्ये शस्त्रक्रिया करण्यामागे एक कारण आहे. उजेडाच्या असलेल्या ठिकाणाहून अंधार असलेल्या ठिकाणी किंवा घरात प्रवेश केला तर क्षणभर डोळ्यासमोर अंधार असतो. अशा स्थितीत घरामध्ये हिरवा किंवा निळा रंग आल्यास असं होत नाही.

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांच्या बाबतीतही असेच घडते. तिथे ते हिरव्या आणि निळ्या कपड्यांमध्ये गोष्टी चांगल्याप्रकारे पाहू शकतात.

हिरवा आणि निळा रंग वापरण्यामागे आणखी एक कारण आहे. निळा आणि हिरवा रंग डोळ्यांना शांती पोहोचवत आराम देतात.

याशिवाय, या रंगामुळे डोळ्यावरील ताण कमी होतो. जेव्हा डॉक्टर रुग्णावर शस्त्रक्रिया करत असतात, तेव्हा ते अत्यंत तणावाखाली असतात. या हिरव्या रंगाच्या कपड्यातील लोक त्यांच्या आजूबाजूला असल्यामुळे तेव्हा त्यांचा मूड स्थिर राहतो.

याशिवाय, या रंगामुळे डोळ्यावरील ताण कमी होतो. जेव्हा डॉक्टर रुग्णावर शस्त्रक्रिया करत असतात, तेव्हा ते अत्यंत तणावाखाली असतात. या हिरव्या रंगाच्या कपड्यातील लोक त्यांच्या आजूबाजूला असल्यामुळे तेव्हा त्यांचा मूड स्थिर राहतो.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *