तुम्हाला माहीत आहे का गालावर खळी का पडते?घ्या जाणून

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

अनेकजण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु नैसर्गिक सुंदरता तुमच्या डोळ्यांमुळे आणि गालावरील खळीमुळे वाढते. गालावर खळी पडणे हा नैसर्गिक सौंदर्याचा एक भाग मानला जातो. विशेषतः ज्या मुला-  मुलींच्या गालावर खळी असते त्यांचे सौंदर्य अधिक वाढते. मान्यतेनुसार ज्यांच्या  गालावर खळी पडतते त्यांचे आयुष्य अत्यंत भाग्यवान असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का गालाव्यतिरिक्त शरीराच्या कोणत्या भागावर खळी पडते ? त्यामागचे नेमकं कारण काय चला जाणून घेऊया.

डिंपल्स स्मित वाढवतात तुमच्या लक्षात आले असेल की ज्या मुलींच्या गालावर खळी असते त्या मुली हसल्यावर आणखी सुंदर दिसतात. अनेकांना असेही वाटते की त्यांच्या गालावर देखील खळी पडावी. परंतु तुम्हाला माहिती आहे का गालावर खळी नेमकं कोणत्या कारणांमुळे पडते. गालावर खळी पडण्याचे कारण अनुवांशिक नसून स्नायूंशीही संबंधित आहे. जगभरात असे अनेक पुरुष आणि महिला सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या गालावरील खळी आणि त्यांच्या स्माईलसाठी प्रसिद्ध आहेत.

स्नायूंमुळे गालावरील खळी तयार होतात का? अनाकांच्या गालावरील स्नायू इतरांपेक्षा लहान असतात ज्यामुळ त्यांच्या गालावर खळी पडते. गालामधील या स्नायूला झिगोमॅटिकस असे म्हणतात. जर तुमच्या गालावरील झिगोमॅटिकस हा स्नायू लहान राहिला किंवा त्याची वाढ झाली नाही तर त्या व्यक्तीच्या गालावर खळी पडते आणि खळीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील सैंदर्य वाढते.

शरीराच्या कोणत्या भागात डिंपल्स दिसतात? तुम्हाला ऐकुण अश्चर्य वाटेल पण तुमच्या गालाव्यतिरिक्त अनेक भगांमध्ये खळी पडू शकते. होय फक्त गालावरच नाही तर तुमच्या हनुवटीवरही खळी तयार होते. रिपोर्ट्सनुसार, चेहऱ्याच्या हनुवटीतील डिंपल हे अनुवांशिक नसून येथे उपस्थित हाडे एकमेकांशी जोडलेले नसल्यामुळे तयार होतात. विज्ञानानुसार, कधीकधी आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या हनुवटीच्या डाव्या आणि उजव्या बाजूची हाडे एकमेकांशी जोडत नाहीत, ज्यामुळे तिथे खळी पडण्याची शक्यता असते. गाल आणि हनुवटी व्यतिरिक्त, शरीराच्या कोणत्याही भागावर खळी दिसू शकत नाहीत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *