आवड असेल आणि तुम्हाला बारावीनंतर थेट सैन्य अधिकारी व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय सैन्याने जानेवारी 2026 च्या बॅचसाठी बारावी झालेल्यांसाठी टेक्निकल एंट्री स्कीम (TES-54) द्वारे अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार joinindianarmy.nic.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात.
याद्वारे 90 पदे भरली जाणार आहेत. 13 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 12 जून 2025 आहे. विद्यार्थ्यांना येथे नमूद केलेल्या चरणांद्वारे शेवटच्या तारखेपूर्वी नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
कोण अर्ज करु शकतो?
या योजनेअंतर्गत फक्त तेच विद्यार्थी अर्ज करू शकतात ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयांसह बारावी उत्तीर्ण केली आहे आणि जेईई मेन 2025 मध्ये बसले आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 16 वर्षे 6 महिने ते 19 वर्षे 6 महिने असावे. म्हणजेच, ज्यांची जन्मतारीख 2 जुलै 2006 ते 1 जुलै 2009 दरम्यान आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत.
निवड कशी होईल?
निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असेल, ज्यामध्ये हे टप्पे समाविष्ट असतील-
जेईई मेन स्कोअरवर आधारित शॉर्टलिस्टिंग
एसएसबी मुलाखत (पाच दिवसांची कठीण परीक्षा)
वैद्यकीय चाचणी
हे सर्व टप्पे पार केल्यानंतरच उमेदवाराची अंतिम निवड होईल.
किती पगार मिळेल?
प्रशिक्षणादरम्यान, उमेदवारांना दरमहा 56100 रुपये स्टायपेंड मिळेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, पदानुसार पगार दिला जाईल.
कोणाला किती पगार मिळतो? लेफ्टनंट: 56100 रुपये ते 177500 रुपये कॅप्टन: 61300 रुपये ते 193900 रुपये मेजर: 69400 रुपये ते 207200 रुपये लेफ्टनंट कर्नल: 121200 ते 212400
कसा कराल करायचा?
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
यानंतर, विद्यार्थ्यांनी “ऑफिसर्स एन्ट्री अप्लाय/लॉगिन” वर क्लिक करावे आणि नोंदणी करावी.
आता विद्यार्थ्यांनी त्यांची संपूर्ण माहिती योग्यरित्या भरावी.
यानंतर, विद्यार्थ्यांनी १२वीच्या गुणपत्रिका आणि फोटो सारखी कागदपत्रे अपलोड करावीत.
त्यानंतर विद्यार्थी फॉर्म सबमिट करतात.
शेवटी विद्यार्थ्यांनी फॉर्मची प्रिंटआउट ठेवावी.